वरळीतील हिट अँड रन प्रकरणाची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. मिहीर शाह नावाच्या तरुणाच्या कारनं वरळीमध्ये दोघांना धडक दिली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.