राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज बारावा दिवस आहे. बुधवारी (१० जुलै) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी पाठ फिरवल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी यावरून सभागृहात जाब विचारला. त्यामुळे आज काय घडामोड घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.