विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान पार पडत आहे. एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे मतदान फुटण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. घोडेबाजार होणार अशीही चर्चा रंगली आहे. या संदर्भात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.