IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशी तालुक्यातील धडवली गावातला पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकवतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती.ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.याला जेव्हा शेजारच्या जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला. तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले. या शेतकऱ्यांनी पौड पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता.त्यावेळी वरून दबाव आला असता त्यांची तक्रार देखील नोंदवली गेली नाही अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.