महायुती सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया व अल्बर्ट संग्रहालयातून राज्यात आणत असलेली वाघनखे ही शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा काही दिवसांपूर्वी इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला आहे.अशातच आता सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लंडनमधील वाघनखांवरुन सुरु असणाऱ्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.