भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळातील प्रत्येक दिवस हा “संविधान हत्या दिवस” आहे, असं संजय राऊत म्हणाले.