मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला 13 जुलैपर्यंत मुदत दिली होती. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या मुदतीचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच मनोज जरांगे पाटील हे आज महासंवाद रॅलीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेले आहेत. यावेळी मनोज जरांगे यांनी सांगितलं की, ते आजच्या दिवस सरकारच्या निर्णयाची वाट बघणार आहेत आणि त्यानंतर मराठा आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरवणार आहेत.