एमआयएम पक्षाचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी हे शनिवारी (१३ जुलै) छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना त्यांनी मनोज जरांगे यांचं कौतुक केलं. आपल्या समाजासाठी ते उभे राहिले त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यामुळे आठ मराठा खासदार निवडून आले, असं ओवैसी म्हणाले. यावेळी त्यांनी मुस्लीम आरक्षणावरही भाष्य केलं.