आयएएसपूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनीचा ताबा घेतेवेळी पिस्तूल रोखणे आणि मारहाण प्रकरणी पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शस्त्राचा दुरुपयोग करून परवाना विषयक अटी आणि शर्तीचा भंग करण्यात आला असून पुणे पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस मनोरमा यांना बजावली आहे.