विधान परिषद निवडणुकीत क्राॅस व्होटिंग झालं हे काँग्रेसने मान्य केलं आहे. आमच्या कोट्यातील मतांसंदर्भात आम्हालाही तो अनुभव आला आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले. विधान परिषदेतील निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलं. त्यावरून आता संजय राऊतांनी लाच देऊन क्राॅसे व्होटिंग झाल्याचा आरोप महायुती सरकारवर केला.