सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत दिली होती. मात्र आता मुदत संपली तरी सरकारकडून यावर ठोस निर्णय झालेला दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण पुकारण्याचा इशारा दिला आहे. तसंच मुदत संपल्यानंतर सरकारमधून कोणाचा फोन आला? या पत्रकाराच्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं आहे.