क्रॉस व्होटिंगवरून संजय राऊत हे शिवसेना शिंदे गटावर गेल्या काही दिवसांपासून गंभीर आरोप करत आहेत. अशातच आता आमदार शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “आमदारांना 25 कोटी दिले आणि दोन एकर जमीन दिली गेली आहे, याचा संजय राऊतांकडे काही पुरावा असेल तर त्यांनी तो दाखवावा, त्यांनी नुसते हवेत तीर मारु नयेत.”