संभाजीराजे छत्रपती यांच्या अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. विशाळगड येथे प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये काहीजण जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली आहे.