शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली. संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि उबाठा गटाचे नेते,पदाधिकारी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर उपस्थित होते. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना असा दावा केला आहे की, केदारनाथमधून 228 किलो सोने गायब झाले आहे. तसेच दिल्लीमध्ये प्रतिकात्मक केदारनाथ मंदिर बनणार आहे अशी चर्चा आहे. यावर देखील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.