आज छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. आता छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हा मोठेपणा आहे. भुजबळ साहेबांनी काल टीका केली मात्र शरद पवार रुसुन बसले नाहीत,एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली.ते दोघेही पोहोचलेले नेते आहेत त्यामुळे ते काय बोलतात ते जगाला कळणार नाही.”, असं जितेंद्र अव्हाड म्हणाले.