काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी (१५ जुलै) विठ्ठल दर्शनासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातात चक्क ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेली वीणा दिली. त्यानंतर नानांनी थेट ही वीणा हातात घेऊनच देवाचं दर्शन घेतलं. याबाबत नाना पटोलेंना विचारलं असता माझ्या डोक्यावर असलेला फेटाही कार्यकर्त्यांनी बांधला आणि वीणाही कार्यकर्त्यांनी हातात दिल्याचं सांगितलं.