“मनोज जरांगे पाटील माझ्यावरच टीका का करतात, हे मला कळत नाही”, असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. “मराठा समाजाने टिकणारं आरक्षण घ्यावं, असं मी मनोज जरांगे पाटील यांना सुचवलं होतं. परंतु, माझ्या त्या वक्तव्याचा मनोज जरांगे यांना राग आल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अलीकडच्या काही सभांमधून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली होती. त्यावर महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.