शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी काल (15 जुलै) उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते मातोश्रीवर उपस्थित होते. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना सांगितलं की, “उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करण्यात आला. हिंदू धर्मात विश्वासघाताला स्थान नाही.” शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.