प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पूजा खेडकर यांनी त्यांच्या घरी काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांना बोलावलं होतं. याबद्दल त्यांनी पत्रकारांना सांगितलं. त्या म्हणाल्या, “मी काल महिला पोलीस कर्मचाऱ्यांना माझ्या निवासस्थानी बोलावले होते.चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांना मी सर्व माहिती देणार आहे.”