आषाढी एकादशीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. वडाळा येथील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात मोठ्या उत्साहात एकादशीचा उत्सव सुरू आहे. विठ्ठल मंदिराला सुमारे ४०० वर्षांचा जुना इतिहास आहे. या मंदिराच्या लगतच लोकवस्ती आहे. गेल्या पाच ते सहा पिढ्यांपासून अनेक कुटुंब येथे स्थायिक आहेत. त्यामुळे एक दोन नव्हे तर वर्षाचे ३६५ दिवस या रहिवाशांना विठू माऊलीचं दर्शन घडत आहे. यानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला हा संवाद.