महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरक्षेत्रीचा राजा म्हणजेच ‘पांडुरंग’ याच पांडुरंगाचा महिमा वर्णावा तितका कमीच. गेली २८ युगं पांडुरंग हा एकाच स्थळी उभा असल्याचे वर्णन संत परंपरा करते. पंढरपूरच्या या राणाला त्याच्या भक्तांनी अनेक बिरुद दिली. विठोबा, विठू माऊली, पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई इत्यादी. या प्रत्येक नावांचा अर्थ आणि त्यामागे दडलेला इतिहास हा भूतकाळाचा साक्षीदार आहे. पांडुरंग आणि पंढरपूर या दोन नावांमध्येही असाच ऐतिहासिक ऋणानुबंध आहे, तो नेमका काय? हे आपण जाणून घेऊ या.