मराठा आरक्षणासंदर्भा सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधक उपस्थित नव्हते. त्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बारामतीत झालेल्या जनसन्मान मेळाव्यात थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला होता. ही टीका करून २४ तास उलटत नाहीत तोवर भुजबळ सिल्व्हर ओकवर पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. त्यामुळे त्यांच्या या भेटीवरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. या भेटीवर आता शरद पवार यांनी देखील भाष्य केलं आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.