विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने जयंत पाटलांचा पराभव झाल्याची चर्चा आहे. या संदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.