आषाढी एकादशीच्या निमित्त मध्य रेल्वेच्या ठाणे ते सीएसएमटी या लोकल ट्रेनमध्ये विठूमाउलीची पालखी निघाली होती. विठू माउली सेवा समिती, ठाणे व श्री स्वामी समर्थ भजन मंडळ, भांडुप यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. मागील १५ वर्षांपासून ही पालखी काढली जाते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वारकऱ्यांनी आज पारंपरिक पद्धतीचं रिंगण धरून भजन, अभंग गात, कीर्तन करत विठूनामाचा गजर केला होता. यावेळी कामावर जाणारे प्रवासी सुद्धा आनंदाने जोडले गेले होते. पुरुषांची फुगडी, टाळ- मृदूंगाच्या तालावर धरलेला ठेका व मनसोक्त आनंद अनुभवणारे चेहरे आजच्या व्हिडीओमध्ये पाहायला विसरू नका.
On the occasion of Ashadhi Ekadashi, the palanquin of Vithumauli was Carried From Thane to CSMT. Vithu Mauli Seva Samiti, Thane and Shri Swami Samarth Bhajan Mandal, Bhandup has been organizing this Event From Last 15 years. At the Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, the Warkari held the Traditional Ringan chanting bhajans, abhangs, kirtans. Mumbai Local Train Commuters also joined in the fun.