हाथरस येथे स्वयंघोषित धर्मगुरू नारायण साकार उर्फ भोले बाबा उर्फ सूरज पाल सिंह जाटव यांच्या सत्संगाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत १२३ जणांचा मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर देशभरातून आयोजक आणि भोले बाबांविरोधात संतापाची लाट उसळली असतानाच नारायण साकार यांनी एक असंवेदनशील वक्तव्य केलं आहे.