‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’नंतर सरकारने लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये बारावी पास तरुणांना सहा हजार तर पदवीधारकांना १० हजार देण्याचा निर्णय करण्यात आला आहे. मग बहिणाला फक्त १५०० रुपये का? त्यांनाही १० हजार रुपये द्या, अशी मागणी आता खासदार संजय राऊत यांनी केली आहे.