मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा केल्यानंतर आता विरोधी पक्ष नेत्यांनी या योजनेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. “लाडका भाऊ योजना म्हणजे तरुणांची फसवणूक”, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली. आता अंबादास दानवे यांच्या या टीकेला अरुण सावंत यांनी उत्तर दिलं आहे.