संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून नीट परिक्षेतील गोंधळ चर्चेचा विषय ठरलेला आहे. निवडणुकीनंतर झालेल्या लोकसभेच्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवरून थेट सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य केलं होतं. त्यामुळे या अधिवेशनात आता कोणत्या घडामोडी घडणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.