संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज (२२ ऑगस्ट) सोमवारपासून सुरुवात होत असून १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नीट पेपरफुटी प्रकरण, रेल्वे सुरक्षा यांसह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता या अधिवेशनात आहे.