भारतीय जनता पक्षाचा मेळावा रविवारी (२१ जुलै) पुण्यात पार पडला. या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आरक्षणाच्या विषयावरून बोलताना अमित शहांनी थेट शरद पवारांचं नाव घेतलं. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजपाचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं. शरद पवार यांचं सरकार आलं तर आरक्षण मिळणार नाही, असं अमित शहा म्हणाले.