तुम्हाला जर राजकारणात यायचं असेल, तर मी आणि प्रविण दरेकर राजीनामा देतो, असं विधान भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना संबोधून केलं आहे. मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका केल्यानंतर प्रसाद लाड यांनी त्यांना थेट राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे. त्यावर आता मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.