कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी सोमवारी रात्री (२२ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. स्थानिक विभाग अध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरुन हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेनेतील अंतर्गत वाद अशाप्रकारे समोर आल्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.