केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदा सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेश अर्थात लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या राज्यांसाठी मोठ्या प्रमाणावर योजनांच्या माध्यमातून निधी देण्यात आला आहे. त्यामुळे नेमका हा अर्थसंकल्प आर्थिक की राजकीय? अशी चर्चा सुरू झाली आहे. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी या अर्थसंकल्पाचं केलेलं हे विश्लेषण!