केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ नंतर काय बदलणार? तुमच्या आमच्या कुठे खिशाला कात्री बसणार? आणि कुठे खिशात चार पैसे जमा होणार? जनसामान्यांसाठी बजेट किती फायद्याचं? मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा काय स्वस्त झालं व काय महागलं? निर्मला सीतारमण यांनी १ तास २५ मिनिटांच्या भाषणात आपल्यासाठी नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत हे आता आपण अगदी झटपट पाहणार आहोत.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी रोजगारासाठी अनेक योजना सादर केल्या आहेत. सीतारामण यांनी अनेक वस्तू आणि सेवांवरील कररचनेत बदलाची घोषणा केली आहे. कर कमी केल्याने काही वस्तू स्वस्त झाल्या आहेत. तर काही वस्तूंसाठी आता आपल्याला अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.