केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी (२३ जुलै) एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प Budget 2024-2025 संसदेत मांडला. गेल्या काही वर्षांत देशातील वाढती बेरोजगारी पाहता, या अर्थसंकल्पात रोजगारनिर्मितीसाठी तीन मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे. रोजगार आणि कौशल्य विकासासाठी या तीन योजना गेमचेंजर ठरतील, असं सांगितलं जात आहे. या योजना पंतप्रधानांच्या अर्थसंकल्पीय पॅकेजचा एक भाग असून, रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणं आणि कर्मचारी व नियोक्ते दोघांनाही भरीव लाभ देणं यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. या योजना काय आहेत? त्यांचा लाभ कोणाला होणार? याविषयी सविस्तर जाणून घेऊ.