अर्थसंकल्पावरुन विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. आज विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग देखील केला. अशातच विरोधी पक्ष नेत्यांच्या टीकेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं आहे. “अर्थसंकल्पीय भाषणात एखाद्या राज्याचं नाव घेतलं नाही, याचा अर्थ त्या राज्याला सरकारच्या योजना दिल्या जात नाहीत, असा होत नाही.”, असं निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत सांगितलं.