नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाकडून अटक वाॅरंट जारी करण्यात आलं आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात फसवणुकीचे किती गुन्हे आहेत, मग मीच का? असा सवाल जरांगेंनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.