पुण्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शहरात ऑरेंज अलर्ट असतानाही नागरिकांना पूर्व सूचना का दिली गेली नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभेत उपस्थित केला.