संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. काही नव्या घोषणा यावेळी करण्यात आल्या. त्याचबरोबर बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना विशेष पॅकेज दिल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. गेले दोन दिवस सभागृहात अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे.