पाणी, नोकरी, आरोग्य याकडे कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही. आपल्याकडे काय आहे? लाडकी बहीण आणि लाडका भाऊ. अहो लाडकी बहीण आणि लाडका भाऊ दोन्ही पक्ष एकत्र राहिले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते, अशी खोचक टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देत आमचा पक्ष का फुटला हे देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला माहीत आहे, असं म्हटलं.