पुणे शहरातील सिंहगड रोडवरील एकतानगर आणि निंबजनगर भागातील सोसायट्यांमध्ये नदी पात्रातील पाणी शिरले. या पाण्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केली.”प्रशासना मार्फत कोणतीही कल्पना न देता,पाणी सोडले आहे.त्यामुळे आमचे नुकसान झाले आहे”, असं नागरिकांनी मुरलीधर मोहोळ यांना सांगितलं. तसेच नागरिकांनी मोहोळ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.त्यावर मुरलीधर मोहोळ यांनी सर्व नागरिकांची समजूत काढली.”तुम्हाला सर्वतोपरी मदत केली जाईल”, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.