भाजपाचे माजी आमदार रमेश कुथे यांनी आज (२६ जुलै) शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. रमेश कुथे यांची ही एक प्रकारची घरवापसीच आहे. कारण ते १९९५ व १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. आज त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी पक्ष प्रवेश केला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपाने आपल्याला कसं मूर्ख बनवलं याबद्दल भाष्य केलं.