“सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे”, अशी टीका शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर केली आहे. अमित शाह यांनी शरद पवार यांचा ‘भ्रष्टाचारी लोकांचे म्होरके’, असा उल्लेख केला होता. शाहांच्या त्या टीकेला शरद पवार यांनी आता चोख प्रत्युत्तर दिलं.