बेलापूर विभागातील शहाबाज गावातील इंदिरा निवास जी प्लस तीन मजली इमारत पहाटे चार वाजून ३५ मिनिटांनी ढासळली. इमारतीत एकूण २६ कुटुंब राहत असल्याची माहिती समोर आली आहे. वेळीच सर्वजण बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये अडकलेल्या दोन नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, पालिकेचे कर्मचारी अधिकारी दाखल झाले असून उर्वरित दोघांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.