खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ ई मधील बी. एम. ज्वेलर्स या सराफाच्या दूकानात रविवारी (२८ जुलै) रात्री १० वाजता तीन चोरांनी बंदूक घेऊन सोन्याचे चांदीचे लाखो रुपयांचे दागीने लुटून नेले. ही सर्व घटना सराफाच्या दुकानातील सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. सराफ दूकानदाराने सायरन वाजवून मदत मागण्याचा प्रयत्न केला, तरी कोणतीही मदत मिळाली नाही. परंतू सायरनच्या धाकेमुळे अवघ्या दोन मिनिटांत चोरट्यांनी हाताल लागेल तेवढे दागीने घेऊन चोरांचे त्रिकुट दुचाकीवर बसून पसार झाले.