महाराष्ट्रातही मणिपूरसारखं काहीतरी घडण्याची चिंता आहे, असं वक्तव्य शरद पवार यांनी एका कार्यक्रमात केलं. त्यांच्या या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार यांनी दंगली घडवण्याची भाषा का केली? त्यांच्या मनात काय आहे ते मला माहित नाही.”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.