गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. अशातच आता अनिल देशमुख यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत समीत कदम यांचे काही फोटो दाखवले. “समीत कदम साधा नगरसेवकही नाही, तरी फडणवीसांनी त्याला वाय सुरक्षा दिली “, असं अनिल देशमुख म्हणाले.