नवी मुंबईतील उरण येथील २२ वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना देखील करण्यात आली होती. यशश्री हिच्या कुटुंबाकडून तिच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. संशयित आरोपी अनेक वर्ष आपल्या मुलीला त्रास देत असल्याने त्याच्याविरोधात 2019 ला पोलिस तक्रार देखील दाखल केली होती असे यशश्रीच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. त्याने केलेले कृत्य खूप वाईट असून या नराधमाला फाशी मिळावी अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.