नवी मुंबईतील उरण येथील यशश्री शिंदे नावाच्या २२ वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे उरण तालुका हादरला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यशश्री शिंदेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांची देखील भेट घेतली आहे. “एकीकडे लाडक्या बहिणीचा गवगवा अन् दुसरीकडे बहिणींवर अत्याचार”, असं यावेळी अंबादास दानवे म्हणाले.