नरहरी झिरवाळ यांनी त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. नरहरी झिरवाळ म्हणाले की, “मी कायम अजित दादांच्या सोबत आहे.” नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार गटामधून निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे दिंडोरीत वडील आणि मुलगा यांच्यात निवडणुकीचा जोरदार सामना रंगणार का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.